रजि.नं.एस.डी.जी/एस.डी.आय./आर.एस.आर./सी.आर./१०२/९१ दि.०५-०८-१९९१
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था
मर्या., सिंधुदुर्ग
मुख्य कार्यालय: सावंतवाडी



Contact Details


HO and Branch Offices

Deposit Schemes






धनश्री बोनस ठेव
या योजनेमध्ये रक्कम गुंतविणाऱ्या सभासदास एका वर्षाने द.सा.द.शे. ८.५% व्याजदर मिळू शकतो. तसेच संस्थेला त्या वर्षात झालेल्या नफ्याच्या प्रमाणात संचालक मंडळाने जाहीर केलेल्या दराने बोनस गणेश चतुर्थी किंवा दिवाळीला मिळू शकतो. सदर ठेव कमीत कमी ३ वर्ष ठेवणे आवश्यक आहे.
संचय समृद्धी ठेव योजना
या योजनेअंतर्गत सभासदास एक पेटी देण्यात येते. त्यात आपल्याकडील रक्कम दररोज जमा करावयाची असते. एका महिन्याने संस्थेचा एजंट / प्रतिनिधी आपल्याकडे येवून आपल्या समक्ष पेटी त्यातील रक्कम समक्ष मोजून आपल्या पासबुकात नोंद करतो. सदर ठेवीवर द.सा.द.शे. ६% व्याज देण्यात येते.
सैनिक गोल्ड बॉन्ड
संस्थेने सैनिक गोल्ड बॉन्ड ही एक आकर्षक ठेव योजना चालू केली असून या योजनेत ठेवीदाराला सैनिक गोल्ड बॉन्ड प्रदान करण्यात येतो. या योजनेत ११.५०% वार्षिक व्याजदर असून व्यवहारातून होणाऱ्या उत्पन्नातून दरवर्षी बोनसही देण्यात येतो.
संस्था कॉल डिपॉझीट
ही ठेव केवळ 'अ' वर्ग सभासद असलेले आजी माजी सैनिक व त्यांच्या पत्नी यांच्यासाठी असून या ठेवीवर खालीलप्रमाणे व्याजदर देण्यात येईल. ही ठेव कमीत कमी ३० दिवस ठेवणे आवश्यक आहे. ३० दिवसांच्या आत रक्कम काढल्यास व्याज दिले जाणार नाही.
१) १ महिना ते ३ महिन्याच्या आत काढल्यास ७% व्याजदर
२) २ महिने ते ६ महिन्याच्या आत काढल्यास ७.५% व्याजदर
३) ६ महिने ते ९ महिन्याच्या आत काढल्यास ८% व्याजदर
४) ९ महिने ते १२ महिन्याच्या आत काढल्यास ८.५% व्याजदर
५) १२ महिन्याच्या पुढे काढल्यास १०.५०% व्याजदर
दीर्घ मुदतीच्या ठेव योजना
१) लाभलक्ष्मी ठेव
अ. क्र. रक्कम मुदत वर्षे मुदतीअंती मिळणारी रक्कम
२२,०००/- ८ वर्षे ३ महिने ५०,०००/-
१६,५५०/- १२ वर्षे ४ महिने ५०,०००/-
७,७११/- २१ वर्षे ५ महिने ५०,०००/-
२)धनलाभ ठेव
अ. क्र. रक्कम मुदत वर्षे मुदतीअंती मिळणारी रक्कम
११,०००/- ८ वर्षे ३ महिने २५,०००/-
८,२७५/- १२ वर्षे ४ महिने २५,०००/-
३,८५५/- २१ वर्षे ५ महिने २५,०००/-
३) लखपती ठेव
अ. क्र. रक्कम मुदत वर्षे मुदतीअंती मिळणारी रक्कम
२०,०००/- १८ वर्षे ३ महिने १,००,०००/-
१०,०००/- २९ वर्षे ९ महिने १,००,०००/-
५,०००/- ३५ वर्षे ३ महिने १,००,०००/-
२,५००/- ४३ वर्षे ९ महिने १,००,०००/-
१,०००/- ५३ वर्षे १,००,०००/-

   Home   |   Contact Us
Developed by RightClick Computers