या अप्सद्वारे आपण घरबसल्या व जेथे इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. अशा ठिकाणी देशातील कोणत्याही भागामध्ये आपले सर्व प्रकारचे मोबाईल रिचार्ज, सर्व प्रकारच्या डिजिटल कंपनीचे रिचार्ज, टेलिफोन बील, वीजबील, इन्शुरन्स अशा अत्यावश्यक सेवांचे बीलपेमेंट तात्काळ करता येईल. तसेच आपल्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तिच्या खात्यावर भारतातील कोणत्याही बँकेत रक्कम जमा करता येईल. सदर सर्व सेवांसाठी संस्थेमध्ये आपले सेव्हिंग किंवा चालु बचत खाते असणे व त्यावर पुरेसा बॅलन्स असणे आवश्यक आहे.
पूर्वी ही सुविधा फक्त नॅशनल बँकांकडेच उपलब्ध होती. परंतु ग्राहकांच्या मागणीनुसार संस्थेने आपल्या खातेदारांना ही सुविधा पुरविण्याचा विचार केला. याद्वारे आपण भारतातील कोणत्याही बँकेतून भारतातील कोणत्याही बँकेत फंड ट्रान्सफर करु शकतात. सदर फंड जलद गतीने एका खात्यावरुन दुसऱ्या खात्यावर वर्ग करू शकता.
पूर्वी ही सुविधा नॅशनल बँकांकडेच उपलब्ध होती. परंतु ग्राहकांच्या मागणीनुसार संस्थेने आपल्या खातेदारांना ही सुविधा पुरविण्याचा विचार केला आहे. याद्वारे आपण भारतातील कोणत्याही बेकेतून भारतातील कोणत्याही बँकेत फंड ट्रान्सफर करू शकतात.
बदलत्या काळाची गरज ओळखून आपल्या ग्राहकाच्या मागणीनुसार संस्थेने ATM कार्ड सुविधा सुरु करण्याचा विचार केला आहे. त्यामुळे आपल्या ग्राहकांना सदर सुविधेचा लाभ घेता येणार आहे. भारतातील कोणत्याही बँकेमधील रक्कम त्या बँकेचे ATM कार्ड संस्थेच्या शाखेत वापरून रु. १०,०००/- पर्यंतची रक्कम शाखास्थरांवर ATM धारकास पतसंस्थेमधून काढता येईल.
संस्थेच्या स्थापनेपासून ते आजतागायतची माहिती सर्व दूरवर व्हावी. म्हणून www.sainikpatsansta.com ही वेबसाईट सुरु केली असून भारतातील कोणतीही व्यक्ती कुठूनही संस्थेची अद्ययावत माहिती पाहु शकते.
संस्थेच्या ठेवीदारांना, पिग्मी, आवर्त ठेव आणि सेव्हिंग खात्याच्या शिलकेची माहिती SMS च्या माध्यमातून देण्यात येते.
लवकरच संस्थेच्या वतीने QR कोड सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. संस्थेच्या खातेदारांना सहजरित्या या कोड चा वापर करून व्यवहार करणे शक्य होणार आहे.