इतिहास
सिंधुदुर्गातील माजी सैनिक हे मोठ्या संख्येने असूनसुद्धा विखुरलेल्या स्वरुपात होते. सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकाला आर्थिक गरज भासल्यास त्यावेळी ती पूर्ण करणारी
कोणतीही आर्थिक वाहिनी नव्हती हे जाणून त्यांना संघटीत करावे व आर्थिक पाठबळ द्यावे म्हणून तत्कालीन खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी एक संकल्पना मांडली व
त्यातूनच सहकारी पतसंस्था निर्माण करण्याचा निर्णय झाला.
या प्रेरणेतूनच सन ५ ऑगस्ट १९९१ साली या संस्थेची नोंदणी झाली. संस्थेचे प्रथम चेअरमन श्री. पी. एफ. डॉन्टस ज्यांनी सहकार खात्यामध्ये सेवा बजावली होती,
त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी ती आपला अनुभव व कौशल्याच्या जोरावर समर्थपणे पार पाडत संस्थेचा आर्थिक पाया मजबूत करण्याचे काम केले.
त्यानंतरच्या कालावधीत आलेले चेअरमन कॅ. रामकृष्ण सीताराम गावडे, श्री. जनार्दन सखाराम चौकेकर आणि ऑ. कॅ. दिनानाथ लक्ष्मण सावंत यांनी सुद्धा संस्थेच्या
उत्कर्षाचा आलेख सतत चढता ठेवला. तसेच त्या काळातील संचालकांनी, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी संस्थेच्या उत्कर्षाला हातभार लावण्याचे मोलाचे कामं केले.
त्यामुळे आज ही संस्था आर्थिकदृष्ट्या मजबूत व सक्षम बनली आहे. विविध सेवा व सुविधा या संस्थेच्या माध्यमातून आज दिल्या जात आहेत.
या सेवा व सुविधा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचाव्यात म्हणून संस्था आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत आपली स्वतःची अशी वेबसाईट प्रकाशित करत आहे. जेणे करून
देशातील अनेकांना संस्थेची माहिती एका क्लिकवर प्राप्त होईल